पुणे ३ मार्च (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) नाशिक येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. नाशिकच्या शासकीय रुग्णालयातील शिशू विभागात शाॅर्ट सर्किट झाला आहे. शाॅक सर्किट मुळे आग🔥 लागल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. तसेच नवजात शिशूच्या पालकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान या घटनेनंतर तातडीने रुग्णालयातील प्रशासनाच्या वतीने शिशूच्या वार्डातील एकूण ६० पेक्षा जास्त बालकांना सुखरूपपणे दुसऱ्या वार्डात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान प्रशासनाच्या तत्परतेने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान या घटनेनंतर महावितरण कंपनीला या रुग्णालया मधील लाईट २४ तास सुरू ठेवण्याचे आवाहन नागरिकांडून करण्यात आले आहे. सध्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सूत्रांनद्वारे माहिती मिळत आहे.