पुणे ४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)आताच हाती एक सकाळी चित्रपट सृष्टीतून एक अपडेट आली असून. अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या ८७व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालया मध्ये निधन झाले आहे. दरम्यान मनोज कुमार यांचे चित्रपट हे विशेषत: देशभक्तीपर चित्रपट साठी ओळखले जात असे. म्हणून त्यांना ‘भारतकुमार ‘ म्हणून देखील ओळखले जात होते. त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये भारत सरकारचा चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
दरम्यान अभिनेते मनोज कुमार यांचे गाजलेले चित्रपट या प्रमाणे आहेत. दस नंबरी. क्रांती. रोटी कपडा और मकान. पुरब और पश्चिम. उपकार. बेईमान. गुमनाम. हिमालय की गोद मे. नील कमल. दो बदन. दरम्यान मनोज कुमार यांना सोशल मीडियावरुन चाहते श्रध्दांजली वाहत आहेत. आणि त्यांची गाणे आज देखील गाजत आहेत. आता त्यांचे हेच एक गाणे पहा ना. भारत का रहनेवाला हू…. भारत का गीत गाता हू या त्यांच्या या गाण्यांमुळे आजही मनाला किती आनंद देते. दरम्यान आता हा अभिनेता आपल्यात राहिलेला नाही त्यांनी आज अखेरचा श्वास आज घेतला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबई मधील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना मागील काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्या होत्या.आणि आज त्यांनी जगाचा शांततेत निरोप घेतला आहे. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. असे कुणाल गोस्वामी यांनी सांगितले आहे.