पुणे ५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांच्या विरोधात आज मुंबईतील माझगाव कैर्टाने निकाल दिला आहे. दरम्यान वांद्रे कोर्टाने करुणा मुंडेंना २ लाख रुपये पोटगी देण्या बाबत निर्णय धनंजय मुंडे यांना आदेश दिला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी वरच्या कोर्टात धाव घेतली होती. मात्र करुणा मुंडे यांनी अनेक कागद पत्रे कोर्टात सादर केली. त्यामुळे आजचा निकाल करुणा मुंडे यांच्या बाजुने लागला आहे. तसेच २ लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला आहे.
दरम्यान आज माझगाव कोर्टाने माजी मंत्री धनंजय मुंडे यांना चांगलाच दणका दिला आहे. तसेच दरमहा करुणा मुंडे यांना २ लाख रुपये पोटगी देण्याचा वांद्रे कोर्टाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे आता मुंडे यांच्या आमदारकीवर प्रश्न आता उपस्थित केले जात आहे. तसे तांत्रिक दृष्ट्या पाहायला गेलं तर धनंजय मुंडे यांनी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात करुणा मुंडे यांच्या बाबत माहिती दिली नव्हती. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते. असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनी म्हटले आहे.