पुणे ५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच हाती पुण्यातूनच एक खळबळजनक अपडेट आली असून पुण्यातील एरंडवणा येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णांकडे तब्बल उपचारासाठी २० लाख रुपयांची रक्कम मागून पैसे न भरलेल्या रुग्णाला उपचारासाठी दाखल करून न घेतल्याने एक महिला प्रस्तुती साठी आली होती तिला उपचार वेळेत न मिळाल्याने संबंधित महिला तनिषा यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात एकच संतापाची लाट उसळली आहे. आज दुसऱ्या दिवशी देखील पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालया बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाच्या वतीने या रुग्णालयावर चिल्लर फेकून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले आहे. दरम्यान पुणे येथील ठाकरे गट शिवसेना व शिंदे गट शिवसेना व सत्ताधारी भाजप तसेच पतित पावन संघटना व काँग्रेस पक्षाच्या वतीने तसेच अन्य सामाजिक संघटना यांच्या वतीने या रुग्णालयावर चिल्लर फेकून आंदोलन करण्यात आले आहे. तसेच शिवसेना यांच्या वतीने पुण्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालय समोर आंदोलन करून त्यांना निवेदन देण्यात आले आहे.