पुणे ७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गरोदर महिलेच्या उपचारा अभावी मृत्यू झालेल्या व या महिलेच्या मृतास जबाबदार असलेल्या व उपचारा करीता २० लाख रुपयांची मागणी करणा-या डॉ घैसास यांनी आता थोड्याच वेळापूर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आपल्या पदाचा राजीनामा संचालक डॉ धनंजय केळकर यांच्या कडे दिला आहे. तसेच भिसे कुटुंब यांनी डॉक्टर घैसास यांना या सर्व प्रकरणात दोषी ठरवले असून. त्यांनी राज्य सरकारकडे डॉक्टर घैसास यांचे वैद्यकीय परवाना रद्द करावा अशी मागणी देखील केली आहे. तसेच महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलडे देखील तशी मागणी केली आहे.