Home अंतर राष्ट्रीय ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणा मुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार

    ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणा मुळे भारतीय शेअर बाजारात हाहाकार

    90
    0

    पुणे ७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)  आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून. ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणा मुळे आज सोमवारी सकाळी शेअर बाजार उघडताच मोठ्या प्रमाणावर शेअर मध्ये पडझड झाली आहे. दरम्यान कोविड नंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज भारतीय शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. दरम्यान आज सोमवारी सकाळी शेअर मार्केट उघडाच भारतीय शेअर मार्केट आज मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. सेन्सेक्स सुमारे ३.१००अंकानी कोसळला आहे. या घसरणीसह  तो ७२.३३१ च्या पातळीवर आला आहे. तर निफ्टी १००० अंकानी घसरला आहे. तो २१.९२४ च्या पातळीवर व्यवहार करत आहे. सेन्सेक्स ६.०५ तर निफ्टी हा ४.३२ टक्क्यांनी कोसळले आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे अनेक लाखो कोटी रुपये बुडाले आहेत. दरम्यान ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे एकूण ५० देशांना याचा फटका बसला आहे. जपान व दक्षिण कोरिया मध्ये तर तब्बल ८ टक्क्यांनी शेअर बाजारात शेअर कोसळले आहेत. आता ५० देश हे ट्रम्प यांच्या बरोबर टेरिफ धोरणाबद्दल चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

    Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धनंजय मुंडेंना माझगाव कोर्टाचा दणका, धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द होणार का?
    Next articleप्रशांत कोरटकरला जेल की बेल? कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात जामीन अर्जावर आज सुनावणी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here