पुणे ७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आतात हाती एक खळबळजनक अपडेट ही कोल्हापूर येथून आली असून. प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज सोमवारी दुपारी कोल्हापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान या पूर्वी कोल्हापूर सह दिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांनी प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळला होता. तर त्या नंतर प्रशांत कोरटकर याच्या वकील यांनी पुन्हा जिल्हा सत्र न्यायालयात त्याच्या जामीना करीता धाव घेतली आहे. दरम्यान आज कोरटकर याच्या जामीन अर्जावर कोल्हापूर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात दुपारी सुनावणी होणार आहे. तर प्रशांत कोरटकर हा सध्या न्यायालयीन कोठडीत कोल्हापूर येथील कळंब येथील जेल मध्ये अंडा सेल मध्ये त्याला दोन सीसीटीव्ही कॅमे-याच्या व कडक सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. दरम्यान कोरटकर याला न्यायालयामध्ये एका वकीलांने मारहाण देखील केली आहे. त्यानंतर आता त्याच्या सुरक्षा व्यवस्था मध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान प्रशांत कोरटकर यांने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल आक्षेपार्ह विधान केले आहे. तर कोल्हापूर येथील जेष्ठ इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्यासाठी मोबाईल फोन📞 वरुन धमकी दिल्या प्रकरणी त्याच्या वर कोल्हापूर येथील राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आज प्रशांत कोरटकर याला जेल की बेल? हे आज दुपारी न्यायालयात स्पष्ट होणार आहे.