पुणे ८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच सकाळी एक अपडेट ही गडचिरोली येथून आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सीमा वर्ती भागात गारांसह अवकाळी पाऊस झाला आहे. दरम्यान वादळी वाऱ्यासह व अचानकपणे गारपीट सह पाऊस कोसळल्याने नागरिकांचा चांगलीच तारांबळ उडाली . तसेच अवकाळी पाऊस झाल्यानंतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे घरांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान सध्या प्रचंड प्रमाणावर सुर्य आग ओकत असताना देखील अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. दरम्यान या पावसामुळे उकाडा असलेल्या ठिकाणी नागरिकांना गारवा निर्माण झाल्याने अनेक नागरिक सुखवले आहेत.