पुणे ८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट ही पुण्यातूनच येत आहे. व पुणेकर नागरिकांसाठी महत्त्वाची न्यूज आहे. आज मंगळवारी पुण्यातील काही महत्त्वाच्या भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तर पुणे येथील या भागात आज पाणी नागरिकांना मिळणार नाही. वारजे. शिवणे औद्योगिक परिसरात. कर्वेनगर तसेच शिवाजीनगर. यातील काही भागात अगदी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे तर काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान सांडपाणी वाहिनीच्या कामामुळे खडकवासला ते वारजे जल केंद्राला जोडणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम सुरू आहे. तरी या भागातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे. असे आवाहन पुणे महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.