Home फायर पुण्यात आज मध्यरात्रीच्या सुमारास घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत होरपळून दोन...

पुण्यात आज मध्यरात्रीच्या सुमारास घरगुती सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत होरपळून दोन जणांचा मृत्यू

211
0

पुणे ९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)  आताच सकाळी पुण्यातील वारजे येथून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून पुणे येथील वारजे माळवाडी भागातील गोकूळ नगर येथे एका पत्र्याच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास सिलिंडरचा💥💣 स्फोट होऊन 🔥आग लागली आहे. या आगीत होरपळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान सदरच्या घटनेबाबत सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या सुमारास दरम्यान तीन वाजता घरातील सिलिंडरचा अचानक स्फोट झाला आहे. व आग लागली आहे. सदरची आग लागली तेव्हा घरातील सर्वजण साखर झोपेत असतानाच ही आग लागली आहे. दरम्यान या आगीत होरपळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या आगीची माहिती मिळताच तातडीने पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात  आणली आहे. दरम्यान या आगीत होरपळून मृत्यू झालेल्या दोन जणांची ओळख पटवण्याचे काम वारजे पोलिस करत आहे.

Previous articleपुण्यात आज दुरुस्तीच्या कामामुळे अनेक भागातील पाणी पुरवठा बंद
Next articleसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आज सुनावणी बीड जिल्हा सत्र न्यायालयात, सीबीआयकडे आणखी एक म्हत्वाचा पुरावा सादर करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here