Home राजकीय ‘ईजा बिजा व तिजा तिसऱ्यांदा चूक केल्यास मंत्रीपद काढून घेणार’

    ‘ईजा बिजा व तिजा तिसऱ्यांदा चूक केल्यास मंत्रीपद काढून घेणार’

    48
    0

    पुणे १० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली असून. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हे त्यांच्या परखडपणे मतं मांडण्याची त्यांची पद्धत आहे.आता अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांना चांगलाच दम भरला आहे.ईजा.बिजा व तिजा एक व दोनदा चूक झाली तर आम्ही समजू शकतो व समजून देखील घेवू मात्र तिच चूक पुन्हा तिसऱ्यांदा केल्यास चूक मान्य करून घेणार नाही.तर आता थेटपणे त्यांचे मंत्रीपद काढून घेणार.असे अजित पवार यांनी म्हटले आहे.दरम्यान मंगळवारी कॉबिनेटची मिटींग संपल्या नंतर देवगिरी या शासकीय बंगाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार व मंत्री यांची बैठक बोलवण्यात आली होती.दरम्यान सदरच्या मिटींग करीता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मिंटींग सुरू झाल्यानंतर आले होते.तसेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांवर केलेल्या विधानामुळे महायुती सरकारवर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर अनेकजण टीका करत आहेत.यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आमदार व मंत्र्यांना एक प्रकारे इशाराच दिला आहे.

    Previous article‘आपले सरकार ‘ पोर्टलची सेवा आज गुरुवार पासून बंद
    Next articleबीड पोलिस खात्यातील पुन्हा दोन पोलिस कर्मचारी निलंबित

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here