पुणे १० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक बीड जिल्ह्यातून खळबळजनक अपडेट आली असून.बीड जिल्ह्यातील केज तालुक्या मधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या नंतर बीड जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रात गाजला आहे.तसेच जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी हे कसे निष्क्रिय आहेत यांच्या बद्दल संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली असताना आज गुरुवारी बीड पोलिस खात्यातील दोन जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी सायबर विभागातील पीएसआय रणजित कासलेंना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.आज पोलिस हवालदार रामदास गिरी आणि वाहन चालक बळीराम भाग्यवंत यांना निलंबित करण्यात आले आहे.दरम्यान बीड जिल्हा पोलिस कार्यालया मधून परवानगी न घेता तपासासाठी गुजरातला गेल्याने या दोन कर्मचाऱ्यांवर बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी ही चौकशी नंतर कारवाई केली आहे.तसेच सायबर विभागातील ठाणेदारांवर देखील निलंबनाची कारवाईची आता टांगती तलवार आहे. असे सूत्रांकडून माहिती मिळत आहे.