पुणे १० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज बीड जिल्ह्यातील सत्र न्यायालयात पार पडणार आहे.दरम्यान यापूर्वी प्रथम सुनावणी ही १ मार्च रोजी केज येथील न्यायालयात पार पडली तर दुसरी सुनावणी देखील १२ मार्च रोजी केज येथील न्यायालयातच पार पडली आहे.तर तिसरी सुनावणी ही सुरक्षाव्यवस्थेच्या दुष्टीकोनातून बीड जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली आहे.तर आज गुरुवारी १० एप्रिल रोजी चौथी सुनावणी ही बीड जिल्ह्यातील सत्र न्यायालयात पार पडणार आहे.दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आणखी काही पुरावे हे सीबीआयला प्राप्त झाले आहेत.ते पुरावे सीबीआय आज बीड येथे सुनावणी दरम्यान न्यायालयात सादर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.