पुणे ११ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक खळबळजनक अपडेट ही अहमदाबाद येथून आली आहे.गुजरातच्या अहमदाबाद येथे एका इमारतीला भीषण अशी आग लागली आहे.दरम्यान इमारतीतला आग लागल्यानंतर लोकांची एकच धावपळ उडाली.व आगीतून बचाव करण्यासाठी तसेच जीवाच्या आकांताने घाबरून लोकांनी इमारतीमधून उड्या मारल्या आहेत.तर काही लोकांनी खिडक्यां मध्ये लटकून जीव वाचवला आहे.दरम्यान अचानक पणे आग लागल्यामुळे या इमारतीत व आजुबाजुला एकच खळबळ उडाली आहे.