Home अंतर राष्ट्रीय तहव्वूर राणाला १८ दिवसांची पोलिस कस्टडी,त्याला भारतात आणण्यासाठी लागला ४ कोटी रुपये...

    तहव्वूर राणाला १८ दिवसांची पोलिस कस्टडी,त्याला भारतात आणण्यासाठी लागला ४ कोटी रुपये खर्च!

    98
    0

    पुणे ११ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली असून. मुंबई वरील २६/११ च्या हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणाला न्यायालयाने १८ दिवसांची पोलिस कस्टडी सुनावली आहे.दरम्यान काल गुरुवारी राणाला अमेरिका येथून लष्करी विमानाने दिल्लीला आणल्या नंतर रात्री त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.राणाला भारतात आणल्या नंतर त्याला  एन आय एम च्या वतीने ताब्यात घेण्यात आले.व त्याला दिल्ली येथील पटियाला न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी न्यायालयात सरकारी वकील यांनी त्याची २० दिवसांची पोलिस कस्टडी मागितली होती.राणा हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने काही पुरावे आणि तथ्य मिळवण्यासाठी त्याची कोठडी हवी आहे.असा युक्तिवाद सरकारी वकील यांनी न्यायालयात युक्तिवाद केला होता.

    दरम्यान मुंबई २६/११ चा हल्ला होऊन तब्बल १६ वर्षे झाले आहे.दरम्यान भारतीय सरकारच्या वतीने त्याला अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते त्याला काल यश आले आहे.आणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या वतीने यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहे.दरम्यान राणाला काल विशेष चार्टर प्लेन Gulf Stream G-550 चा वापर करून भारतात आणण्यात आले आहे.या विमानाचा एक तासाचा खर्च ९ लाख रुपये आहे.विमान सुमारे ४० तासांनंतर ते दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ पालम या विमानतळावर उतरले.दरम्यान मियामी येथून भारतात आणण्यासाठी जवळपास ४ कोटी रुपये खर्च आला आहे.

    Previous articleबीड पोलिस खात्यातील पुन्हा दोन पोलिस कर्मचारी निलंबित
    Next articleमहिन्याच्या ७ तारखेला खात्यात जमा होणार पगार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here