पुणे ११ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक अपडेट आली असून एसटी कर्मचारी यांच्या साठी आनंदाची बातमी आहे.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कामगारांच्या पगारा बाबत माहिती दिली आहे.दरम्यान यापुढे एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल याची जबाबदारी एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझी असेल.असे देखील ते यावेळी म्हटले आहे.तसेच आर्थिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन कधीही रखडणार नाही.याची जबाबदारी मी घेईन.असे ते म्हणाले आहेत.एसटी मुख्यालयात ते बोलत होते.
दरम्यान बोलताना ते असे म्हणले की.पुढील में महिन्या पासून एसटी कामगारांच्या पगारासाठी लागणारा निधी हा एक महिना आधीच एसटी महामंडळाला राज्य सरकार हस्तांतरित करणार आहे.तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला एसटी कामगारांचा पगार दिला जाणार आहे.ज्या१हजार ७६ कोटींची मागणी एसटी महामंडळाने केली होती.त्यापैकी १२० कोटी आता देण्यात येणार आहेत.तर उर्वरित रक्कम तीन टप्प्यात एसटी महामंडळाला राज्य सरकारच्या वतीने मिळणार आहेत.