पुणे १२ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती सकाळी एक खळबळजनक अपडेट ही धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातून आली आहे. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा सराईत गुंड आहे.दरम्यान त्याच्यावर धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात एका जत्रेच्या आखाड्यात पहिलवानानेच हल्ला केला आहे.अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान गावाच्या जत्रेत एका आखाड्यात प्रथमच अशाप्रकारे एका गुंडावर हल्ला झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पुण्यातील घायवळ टोळीचा गुंड निलेश घायवळ हा धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंदरुड गावात जंत्रे निमित्ताने गेला होता.यावेळी तो जत्रेतील आखाड्यात कुस्तीच्या पहिलवान यांना भेटण्यासाठी गेला होता.यावेळी त्यांच्यावर अचानकपणे एका पहिलवानानेच हल्ला केला आहे.त्यामुळे जत्रेत एकच खळबळ उडाली दरम्यान या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.दरम्यान निलेश घायवळ यांच्यावर हल्ला करणारा गुंड हा आहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड गावाचा असल्याची माहिती मिळत आहे.