पुणे १५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून एक खळबळजनक अपडेट हाती आली असून.धायरी येथील श्री ज्वेलर्स या दुकानांवर अज्ञात दरोडेखोरांनी खेळण्यातील प्लास्टिकची बंदूक दाखवून भरदिवसा दरोडा टाकला आहे.व या सोन्याच्या दुकाना मधून २५ ते ३० तोळे सोने लुटून नेले आहे.दरम्यान लुटमारीच्या दरम्यान सराफ हक्काबक्का झाला आहे.दरम्यान सदर चोरी प्रकरणी सराफाने नांदेड सिटी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान सदर दरोडा बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.पुण्याती सिंहगड रोड भागातील नांदेड सिटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत धायरी येथील भागातील श्री.ज्वेलर्स हे दुकान विष्णू दहिवाळ यांच्या मालकीचे असून आज दुपारी या दुकानात ३ अज्ञात हल्लेखोरांनी दुकानांमध्ये प्रवेश करुन खेळण्या मधील प्लास्टिकचे पिस्तूल दाख दाखवून दरोडा टाकला व दुकानातून २५ ते ३० तोळे सोने चोरून नेले आहे.दरम्यान दरोड्यावेळी दुकान मालक हा हक्का बक्का झाला आहे.दरम्यान हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.दरोडा टाकल्या नंतर हे सर्व दरोडेखोर फरार झाले आहेत.याबाबत दुकान मालक विष्णू दहिवाळ यांनी नांदेड सिटी पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे .दरम्यान पोलिसांनी 👮 दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले आहे.दरम्यान या बाबत अज्ञात चोरट्यांचा शोध नांदेड सिटी पोलिस करत आहेत.