पुणे १५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) काल सोमवारी लखनो येथील स्टेडियमवर आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनो यांच्यात अटी तटीचा सामना झाला.हा सामना चेन्नई सुपर किंग्सने ५ विकेट राखून जिंकला आहे.दरम्यान यावेळी महेंद्रसिगं धोनी व शिवम दुबे हे दोघेजण खेळत होते.याबाबत मुंबई इंडियन्सचा सलामी फलंदाज सूर्यकुमार यादव याने महेंद्रसिगं धोनी व शिवम दुबेची इन्स्टा स्टोरी ठेवली आहे.यात ‘M.S धोनी -द अनटोल्ड स्टोरी ‘ या या चित्रपटाचा डायलॉग त्याने लिहिला आहे.’माही भाई -स्टाईक देंगे तुम बना लेगा? दुबे -ट्राय कर लेगा! माही भाई-ट्राय करना है तो हम ही कर लेते है बस तुम रन आऊट मत कर देना!” अशी कालच्या सामान्यवर सूर्यांने पोस्ट केली आहे.व त्याची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.