Homeआरोग्यपुण्यात १२ रुग्णालयासह काशीबाई नवले मेडिकल कॉलेज यांनी धर्मादाय कायद्याचे वाजवले बारा,वर्षाभरात...
पुण्यात १२ रुग्णालयासह काशीबाई नवले मेडिकल कॉलेज यांनी धर्मादाय कायद्याचे वाजवले बारा,वर्षाभरात एकही रुग्णालयावर केले नाही मोफत उपचार या रुग्णालयावर होणार कारवाई
पुणे १६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दरम्यान पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला पैसे अभावी उपचार नाकारण्यात आले व त्यातच तिचा दुर्दैवी असा मृत्यू झाल्या नंतर कुंभकर्ण सारखे राज्यात राज्यात झोपलेले राजकीय नेते व प्रशासन जागे झाले आहे.पुण्यात मागील अनेक वर्षांपासून ही रुग्णालये गरीब सामन्य नागरिकांवर मुजोरगिरी करत आहेत.यात काशीबाई नवले मेडिकल कॉलेज एक नंबर आहे.दरम्यान धर्मादाय आयुक्त कार्यालयाने याबाबत दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते डिसेंबर २०२४ एक वर्षाच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील ८६ हजार ८२६ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.यात पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे ५८ हाॅस्पिटलची नोंद आहे.तसा शासकीय फायदा हे रुग्णालय मोठ्या प्रमाणावर घेत आहेत.त्यापैकी एकूण १२ रुग्णालयांनी आतापर्यंत गरीब व होतकरू रुग्णांवर एक रुपया देखील खर्च केला नाही उलटपक्षी आमचे रुग्णालय हे खासगी मालमत्ता आहे.आम्ही धर्मादाय असं फक्त रुग्णालयावर लिहिले आहे.आम्हाला त्यांचा काही फायदा होत नाही.सरकार आम्हाला एक रुपया देखील अनुदान अथवा शासकीय फायदा देत नाही.असे काशीबाई नवले मेडिकल कॉलेजवर बेकायदेशीर रित्या बसलेले म्हातारा डायरेक्टर ए.व्ही भोरे यांनी सांगितले आहे.आम्ही तेथील अधिष्ठाता पाटील यांच्या बरोबर बोलण्याचा प्रयत्न केला असता म्हतारा डायरेक्टर भोरे यांनी बोलू दिले नाही.असा हा मुजोरगिरी हा करत आहे.या मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष मारुती नवले आहेत.आता अशा मुजोरगिरी करणा-या मेडिकल कॉलेजवर महायुतीचे सरकार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान गरीब रुग्णांसाठी बेड राखीव न ठेवणारी ही आहेत १२ मुजोर रुग्णालय यात सर्व प्रथम नंबर येतो तो १) काशीबाई नवले मेडिकल कॉलेज न-हे पुणे.२) मातोश्री मदनबाई धारीवाल ३) डॉ.जल मेहता रुरल क्रिटिकल केअर सेंटर ४) गिरीराज हाॅस्पिटल ५) एन .एम वाडिया हॉस्पिटल ६) मीरा हाॅस्पिटल ७) परमार हाॅस्पिटल.८) दीनदयाळ मेमोरियल हॉस्पिटल ९) हरजीवन हाॅस्पिटल १०) रत्ना मेमोरियल हॉस्पिटल ११) जोशी हाॅस्पिटल १२) महात्मा गांधी नेत्र रुग्णालय अशी या सर्व मुजोर रुग्णालयांची नावे आहेत.दरम्यान ही सर्व रुग्णालय धर्मादाय आयुक्त यांच्या मार्फत सर्व शासकीय फायदा घेत आहेत.तसेच धर्मादाय आयुक्तां च्या निर्देशांनुसार संबंधित रुग्णालयावर ‘धर्मादाय ‘ असा उल्लेख करणे अपेक्षित असते.तसेच गरीब व निर्धन रुग्णांसाठी १० टक्के खाटा राखीव असल्याचा फलक तसेच करण्यात येणाऱ्या खर्चाबाबत स्पष्टपणे आकडे लिहिणं क्रमप्राप्त आहे.तसेच योजनांची माहिती देणारा स्वतंत्र प्रतिनिधी आणि त्याचा संपर्क क्रमांक प्रदर्शित करणे आवश्यक आहे.दरम्यान या १२ रुग्णालयांनी धर्मादाय आयुक्तांच्या नियमाला कच-या ची कुंडी दाखवली आहे.तसेच येणाऱ्या गरीब रुग्णांना अपमानास्पद भाषेचा वापर करून हाकलून दिले आहे.आता या सर्व हाॅस्पिटलवर शासनाचा वतीने कारवाई करण्यात येणार आहे.