पुणे १६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही बीड जिल्ह्यातून आली आहे.बीड पोलिस दलातील निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले हे स्वतः हून बीड पोलिसांसमोर सरेंडर करणार आहेत.काही दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर स्वतः शेअर करुन त्यांनीच ही माहिती दिली होती. दरम्यान त्यांनी पुढे असं म्हटले की ” पळून उपयोग होणार नाही .मी आलेल्या संकटांचा सामना करणार आहे.धनंजय मुंडे आता वाॅशिंग मशिन मध्ये क्लीन होऊन बाहेर येणार आहे.यात माझाच फक्त बळी जाणार हे मला माहिती आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी एका व्हिडिओमध्ये जातीवाचक शब्द वापरल्यामुळे रणजित कासले यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.