पुणे १६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली असून इंडिया जस्टीस रिपोर्ट २०२५ जाहीर करण्यात आला आहे.सदरच्या रिपोर्टमध्ये कर्नाटक राज्य हे अव्वल स्थानी आहे तर महाराष्ट्र राज्य हे तब्बल दहाव्या स्थानावर आहे.दरम्यान महाराष्ट्र हे सन २०२२ मध्ये बाराव्या स्थानावर होते.ते आता दहाव्या स्थानावर आले आहे.मात्र या रिपोर्ट मध्ये कर्नाटक राज्याने पुन्हा एकदा पहिला क्रमांक पटकावला आहे.
दरम्यान पोलिस, न्यायव्यवस्था, तसेच तुरुंग आणि कायदेशीर मदत या चार निकाषांच्या आधारे राज्यातील न्याय व्यवस्थेचे मुल्यांकन करण्यात येते. त्यानुसार यादीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.पुढील प्रमाणे आहे.१) कर्नाटक राज्य २) आंध्रप्रदेश राज्य ३) तेलंगण राज्य ४) केरळ राज्य ५) तामिळनाडू राज्य ६) छत्तीसगड राज्य ७) मध्यप्रदेश राज्य ८) ओडिशा राज्य ९) पंजाब राज्य १०) महाराष्ट्र राज्य ११) हरियाणा राज्य १२) बिहार राज्य १३) राजस्थान राज्य १४) झारखंड राज्य १५) उत्तराखंड राज्य १६) उत्तरप्रदेश राज्य १७) पश्चिम बंगाल राज्य,या राज्यांचा समावेश आहे.