पुणे १६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली आहे.महायुती मधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरने पुन्हा मुंबई वरुन सातारा जिल्ह्यातील दरेगावी त्यांच्या कुटुंबीयांसह दाखल झाले आहेत.दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असलेकी ते त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरेगावी जातात हे आता समीकरणच झाले आहे.दरम्यान ते आज दरेगावी घरगुती कार्यक्रम असल्याने तीन दिवस जात असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.