पुणे १६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार नाशिकमध्ये रात्रीच्या सुमारास अतिक्रमण काढण्याच्या मुद्द्यावरून नाशिक येथील काठे गल्लीतील परिसरात मध्ये रात्री च्या सुमारास अतिक्रमण काढण्याच्या अफवेतून दगडफेक करण्यात आली आहे.दरम्यान यावेळी ४०० पेक्षा अधिक जमाव जमला होता.आणी यावेळी सदर ठिकाणी पोलिस हे जमाव शांत करत असताना जमावाने पोलिसांवर देखील दगडफेक केली आहे.यात ४ पोलिस जखमी झाले असून.यावेळी संतप्त झालेल्या जमावाने ५ वाहनांचे देखील नुकसान केले आहे.सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या वतीने न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल रोजी काठे गल्लीतील एका अनाधिकृत दर्ग्याला नोटीस बजावली होती आणि त्यातुनच हा सर्व प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.