पुणे १७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट हाती आली आहे.संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी घटना पुणे येथे घडली होती.पुण्यातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या स्वारगेट एसटी बस स्थानकावर उभ्या असलेल्या बस मध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे (रा.शिरुर जिल्हा पुणे) याच्या विरोधात शिवाजीनगर सेशन कोर्टात पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 👮 तब्बल ८९३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.दरम्यान सदरची घटना घडल्यानंतर या घटनेचा संपूर्ण तपास पूर्ण करत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ५२ दिवसांमध्ये तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.दरम्यान ही घटना दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडवर घडली होती.यातील आरोपी दत्ता गाडे यांने स्टँडवर उभ्या असलेल्या एका बसमध्ये युवतीवर बलात्कार केला होता.दरम्यान सदरची घटना घडल्यानंतर या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते.व आरोपीवर संताप व्यक्त करण्यात आला होता.