पुणे १८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील शिवाजीनगरच्या काॅग्रेस पक्षाच्या कार्यालया समोर जाऊन आंदोलन करण्याचा पवित्रा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन सुरू झाले आहे. पण त्यांना पुणे पोलिसांनी 👮 बालगंधर्व चौकात बॅरीकेट्स लाऊन त्यांना अडवले आहे.यावेळी पोलिस आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आहे.भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक झाले आहेत.दरम्यान काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची देखील मोठ्या प्रमाणावर काॅग्रेस भवनात दाखल झाले आहेत.दरम्यान नॅशनल हेराल्ड प्रकरणी हे आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते हे आता बालगंधर्व चौकात बसलेले आहेत.त्या ठिकाणी पुणे पोलिसांनी 👮 रोडवर आडव्या गाड्या लावल्या आहेत.व त्यांना रोखून धरले आहे.