पुणे १८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही महाराष्ट्रा ची राजधानी मुंबई वरुन आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकीकडे महाराष्ट्रात रहाणाऱ्या सर्वांना मराठी भाषा आली पाहिजे असे म्हणतात तर दुसरीकडे हिंदी भाषा देखील सर्वांना शिकली पाहिजे असे वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्रात याचे चांगले पडसाद उमटले आहेत.तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठी भाषेवर ठाम आहेत. त्यांनी म्हटले आहे की पहिली पासून हिंदीची सक्ती खपवून घेतली जाणार नाही.असे परखड मत त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.तसेच अभ्यासक्रमातील हिंदीची पुस्तके संपूर्ण महाराष्ट्रात विकून दिली जाणार नाही.तसेच महाराष्ट्रात ‘ हिंदीकरण ‘ या सरकारला यशस्वी होऊ देणार नाही. असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान दुसऱ्या बाजूला मराठी भाषा आली पाहिजे व हिंदी भाषा देखील शिकली पाहिजे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला राजकारणातून देखील मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. तर आता या निर्णयाच्या विरोधात शिक्षक संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत.आता या शिक्षक संघटनांनी मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहून हा निर्णय तातडीने मागे घेण्यात यावा अशी मागणी केली आहे.