पुणे १९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही उत्तरप्रदेश येथून आली आहे.उत्तर प्रदेश राज्या मधील बिजनौर येथील एका पोलिसाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.ऑंन ड्युटीवर असलेला पोलिस चक्क मस्तपणे दारु पिऊन रस्त्यावर त्याचा टांग पलटी झाल्याने इकडून तिकडे पडताना दिसत आहे.दरम्यान त्याच्या हातात AK-56 रायफल देखील आहे.पण खरा प्रश्न पडतो की रायफल घेऊन व ऑन ड्युटी असतात दारु कशी प्यायली असा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.तसेच तो नशामध्ये असताना त्याची बंदूक कुणी नेली असती किंवा रोडवर अपघात घडला असता तर त्याला जबाबदार कोण? असे म्हणत अनेक नेटक-यांनी या पोलिसावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.