Home राजकीय हा सुवर्णक्षण ठाकरे कुटुंबानेच नाही तर, सर्व कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र...

    हा सुवर्णक्षण ठाकरे कुटुंबानेच नाही तर, सर्व कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यावं

    146
    0

    पुणे १९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट आली आहे.’मराठी अस्मितेला नख लावू पाहणा-या महाराष्ट्रदोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा एक सुवर्णक्षण असेल.दरम्यान केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हीत आहे ‘, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी ट्विट केले आहे.दरम्यान आज सर्वच इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर याबाबत न्यूज झळकत आहेत.की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या आज संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील लोकांमध्ये आहे.दरम्यान आमदार रोहित पवार यांचा रोख नेमका त्यांच्या आजोबा शरद पवार व काका अजित पवार यांच्याकडे हा रोख आहे का ? याबाबत देखील आता अनेकांना पडलेला प्रश्न आहे.

    Previous articleथोड्याच वेळात आमदार गोरखे व भिसे कुटूंबीयांची पत्रकार परिषद
    Next articleड्यूटीवरच पोलिसाचा टांगा पलटी व्हिडिओ व्हायरल

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here