पुणे १९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात १० लाख रुपयांची उपचारासाठी मागणी करुन गर्भवती 🤰 महिलेला उपचार नाकारल्या मुळे महिलेचा उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता.ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना अहवाल दिला की तब्बल ४ तास पेंशडला उपचार न दिल्याने उपचारा अभावी सदर महिलेचा मृत्यू झाला आहे.हा अहवाल पुणे पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी 👮 दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील स्री रोग तज्ञ डॉ सुश्रुत घैसास यांच्यावर पुण्यातील अलंकार पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याबाबत भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोरखे व भिसे कुटुंबियांनी डॉ सुश्रुत घैसास यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.त्यानंतर आज अहवाल प्राप्त झाल्यानंतर डॉ घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत थोड्याच वेळात विधान परिषदेचे आमदार गोरखे व भिसे कुटुंबियांच्या वतीने पत्रकार परिषद घेणार आहेत.