पुणे २० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून अपडेट ही नाशिक जिल्ह्यातून हाती येत आहे.महायुतीचे सरकार सत्तेवर आले पण मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आले नाही.त्यामुळे आता त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालया समोर तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणा वर बॅनरबाजी केली आहे.नवीन सरकार मध्ये यावेळी महायुती सरकारने भुजबळांना मंत्रीपदातून वगळले आहे.दरम्यान भुजबळ यांचे खातं अन्नधान्य उत्पादन शुल्क हे बीडचे धनंजय मुंडे यांना देण्यात आले होते. पण केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या नंतर त्यांचे सहकारी वाल्मीक कराड याला अटक केल्यानंतर विरोधकांनी मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा म्हणून दावा केला होता.त्या नंतर मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना मंत्रिपद द्यावे.म्हणून आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा नाशिक मध्ये बॅनरबाजी करून मंत्रीपदासाठी मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागली आहे.दरम्यान या बाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे.