पुणे २० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक पुणे जिल्ह्यातील भोर येथून आली आहे.पुण्यातील उपनगर न-हे येथे राहणारे कुटुंब हे पुणे जिल्ह्यातील भोर येथील राजगड वाॅटरपार्क येथे फिरायला गेले होते.यावेळी तेथील वाॅटरपार्क मध्ये झिपलायनिंग करताना तब्बल ३० फूट उंचीवरून पडून २८ वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेत मृत्यू झालेल्या युवतीचे नाव अरुणा आटपाळकर (वय २८ रा.न-हे पुणे) असं आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे येथील न-हे येथे राहणारे आटपाळकर कुटुंब हे दिनांक १८ एप्रिल रोजी भोर येथील राजगड वाॅटरपार्क येथे फिरायला आले होते.यावेळी अरुणा ही शुक्रवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तरल झिपलायनिंग करताना ती रोप वरुन चालताना सुरक्षा दोर वरच्या बाजूच्या रोलिंगला लावण्याचा प्रयत्न करत होती.त्या वेळी तिचा हात तिथपर्यंत जात नसल्याने तिने लोखंडी स्टूलवर उभी राहून दोर वरच्या बाजूला लावत असताना अचानकपणे स्टूल हलला आणि ती ३० फूट खाली जमिनीवर कोसळली दरम्यान तिला तातडीने उपचारासाठी नसरापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. दरम्यान सर्व कुटुंब हे फिरायला आनंदाने गेले होते पण अचानकपणे अशी दुर्दैवी घटना घडल्या नंतर या युवतीचा मृत्यू झाल्याने सर्व आटपाळकर कुटुंब हे दुःखात बुडाले सदर घटनेबाबत नंदकिशोर श्रीपती आटपाळकर यांनी राजगड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.दरम्यान या युवतीच्या मृत्यू नंतर न-हे परिसरात सर्वजण हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान या घटने बाबत पुढील तपास राजगड पोलिस करत आहेत.