पुणे २० एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक राजकीय वर्तुळातून अपडेट ही मुंबई वरुन आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक येथील दौरा हेलिकॉप्टरच्या तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाला आहे.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते समीर भुजबळ यांनी दिली आहे.आज अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर येणार होते.त्यांच्या हस्ते नाशिक मध्ये एका रुग्णालयाचे उद्घाटन होते.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांबरोबर मिटिंग होती . दरम्यान आज मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर अजित पवार हे सकाळीच पोहोचले होते.पण जेहू येथून त्यांना घेण्यासाठी येणाऱ्या हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे ते हेलिकॉप्टर महालक्ष्मी रेसकोर्सवर पोहोचले नाही.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिकचा दौरा रद्द झाला असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते समीर भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.दरम्यान अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर येणार म्हणून नाशिक येथील भुजबळ यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली होती की.छगन भुजबळ यांची मंत्रीमंडळात वर्णी लावावी पण आता अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते हे नाराज झाले आहेत.कारण पण तसेच आहे.की महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर अजित पवार यांचा नाशिक हा पहिलाच दौरा होता.