पुणे २१ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) बाणेर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या काॅप्स २४ चे तीन बीट मार्शल यांना एका सोसायटीत काम सुरू करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी वरीष्ठ पोलिस अधिकारी यांनी या तीन लाचखोर पोलिसांना खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.दरम्यान या घटनेनंतर पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान संपूर्ण पुणे शहरात असणाऱ्या पोलिस स्टेशन पैकी बाणेर पोलिस स्टेशन नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.पण वरिष्ठ अधिकारी यांच्या सहकार्याने येथे बरेच उद्योग एक पोलिस शिपाई करत आहे.अर्थजणा मुळे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पुणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी लाच घेतल्या प्रकरणी काॅप्स २४चे तीन बीट मार्शल यांची नावे.पोलिस अंमलदार संतोष जगुन शिंदे, प्रतीक महेश त्रिंबके , दिनेश संतोष इंगळे सर्व जण कार्यरत बाणेर पोलिस स्टेशन.या तीन पोलिस कर्मचारी यांनी ३ हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी या तिन्ही जणांवर तडकाफडकी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.दरम्यान यातील हे तीन अंमलदार हे बाणेर पोलिस स्टेशन मध्ये काॅप्स २४चे बीट मार्शल म्हणून कार्यरत असताना पाषाण येथील शिवालय सोसायटीत पार्किंगचे काम सुरू असताना तेथे ५ हजार रुपयांची लाच मागितली आणि ३ हजार रुपयांची लाच घेतल्याचा यांच्यावर आरोप आहे.याबाबत गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी लाचेच्या आरोपावरून ही निलंबणाची कारवाई केली आहे.दरम्यान बाणेर पोलिस स्टेशन मध्ये एक पोलिस शिपाई बाणेर भागात वसुलीचे काम करतो त्याचा पोलिस स्टेशन मध्ये एवढा दबदबा आहे की याच्या आदेशाशिवाय पोलिस स्टेशन मधील पान देखील हालत नाही.तो कधी येतो कधी जातो राम जाणे.वरिष्ठ पोलिस निरीक्षक व क्राइम पोलिस निरीक्षक हे दोघेजण देखील या पोलिस शिपायाला दचकून राहतात.एवढा दरारा या चतुर्थ कर्मचाऱ्याचा दबदबा आहे.एखद्या गुन्ह्यात कलमं कोणती लावायाची याचा आदेश देखील हे महाशय देतात तसेच कोणाला उचलायचे कोणाला सोडायचं हे देखील यांच्या आदेशानुसार चालते तर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या खुर्चीवर बसून ते आदेश देतात या भागातील शेंबड्या पोराला देखील या चतुर्थ पोलिस कर्मचारी यांचे नाव माहीत आहे.पण यांच्यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार देखील कारवाई करत नाही हे सर्व अर्थजणामुळे चालत आहे.या चतुर्थ कर्मचाऱ्याचा आणखी प्रताप पुढं नक्की वाचा.