पुणे २१ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक राजकीय वर्तुळातून खळबळजनक अपडेट ही पुण्यातून येत आहे.दरम्यान आज सोमवारी सकाळी पुण्यातील मांजरी बुद्रुक येथील साखर संकुलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेजण एका मिटींगच्या निमित्ताने दाखल झाले आहेत.दरम्यान या चर्चेच्या वेळी जेष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांच्यात बंद दाराआड म्हत्वाची चर्चा झाल्याबद्दल सूत्रांकडून माहिती मिळत आहे.दरम्यान या दोघा काका पुतण्यात नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मात्र गुलदस्त्यात आहे.मात्र शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्वव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा भावांनी महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या करीता एकत्र येण्याची भावना दोघा भावांनी बोलून दाखवली आहे.त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी देखील ट्विट करत अन्य राजकीय पक्षातील लोकांनी महाराष्ट्रा करीता एकत्र येण्याची भावना व्यक्त केली होती.तेव्हा नेमका सूर रोहित पवार यांचा त्यांचे आजोबा शरद पवार व काका अजित पवार यांच्या बाबत तर नव्हता ना असा प्रश्न अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांना पडला होता. आणि योगायोगाने आचच पुण्यातील साखर संकुलमध्ये जेष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे काका पुतणे एकत्र आल्या नंतर व त्यांची बंद दारा आड चर्चा झाल्या नंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जर खरच महाराष्ट्राच्या राजकारणात उध्दव ठाकरे व राज ठाकरे तसेच शरद पवार व अजित पवार हे एकत्र आले तर खरच महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडेल हे मात्र नक्की आणि या लोकांनी एकत्र आल्यास दुसऱ्यांच्या पोटात दुखायचे काही कारण नाही. कारण राजकारणात कधी काय घडेल हे नेमक्यापणे सांगणं देखील अवघड आहे.दस्तूरखुद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की.माझ्या काकांच्या पुण्याईने माझे अगदी व्यवस्थित चालले आहे.