पुणे २१ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरातील सर्वात महत्त्वाचा पुलांपैकी एक जास्त म्हणजे २४ तास वाहनांची मोठी वर्दळ असलेला एक भिडे पूल आहे.दरम्यान आज पासून हा पूल पुढील दीड महिन्यांसाठी वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. दरम्यान नदीपात्रात मेट्रो डेक्कन स्थानकाला जोडण्या साठी पादचारी पुलाच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे या पूलावरुन जाणाऱ्या वाहतूक साठी येणाऱ्या वाहनांनी टिळक चौक खंडोजीबा चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.तसेच अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा.दरम्यान पूना हाॅस्पिटल परिसरातील पूल केवळ दुचाकी वाहनांसाठी खुला आहे.