पुणे २२ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच सकाळी राजकीय वर्तुळातून एक खळबळ जनक अपडेट हाती आली असून.सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येण्यावरुन मोठ्या प्रमाणावर चर्चा व खल सुरू आहे.दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघा बंधूचे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार व महायुती सरकार मधील उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे काका पुतणे एकत्र येणार यावर चर्चा सुरू आहे.यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.शरद पवार व अजित पवार एकत्र आले.तर आपली यावर हरकत नाही.दोन्ही नेते यावर काय निर्णय घेतील,तो आपल्या ला मान्य असेल.अशा त्या म्हणाल्या, तसेच कौटुंबिक संबंध हे आमचे फार जुने आहेत.आमचे राजकीय मतभेद मतभेद जरी असले तरी कुटूंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत,असे त्या म्हणाल्या आहेत.