पुणे २२ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट आली आहे. सदरची अपडेट ही जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथून आली आहे.जम्मू काश्मीर येथील वैसरन येथे आज मंगळवारी अतिरेकी यांनी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना जात विचारुन त्यांच्यावर अंदाधुंद फायरींग करण्यात आली आहे.यात एकूण २८ पर्यटक यांचा मृत्यू झाला आहे.यात अन्य १२ पर्यटक गंभीर रित्या जखमी झाले असून यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.यात अजून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान याबाबत अजून गृहमंत्रालय आणि सुरक्षा विभागाच्या वतीने अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आज साडेतीन वाजण्याच्या सुमारास जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील वैसरन येथे २ ते ३ अतिरेकी यांनी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर त्यांची जात विचारुन अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे.या गोळीबारात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य १२ पर्यटक हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत.यातील काही पर्यटक हे राजस्थान .ओडीसा. गुजरात. महाराष्ट्र.तामीलनाडू.कर्नाटक राज्यातील पर्यटक आहेत.दरम्यान हा हल्ला सर्वात मोठा हल्ला आहे.आतापर्यत झालेल्या हल्ल्यापेक्षा हा सर्वात मोठा हल्ला अतिरेकी यांनी जम्मू काश्मीर मध्ये केला आहे. दरम्यान गृहमंत्री अमित शाह व जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा हे थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल होतील.शाह हे दिल्ली वरुन जम्मू काश्मीरकडे रवाना झाले आहेत.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अबुधाबी येथे दौऱ्यावर आहेत.दरम्यान जखमी मध्ये काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.यात मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.