पुणे २३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक मोठी अपडेट आली असून.जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरान व्हाॅलीमध्ये दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षा दलाच्या वतीने खो-यातून १ हजार ५०० पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतले आहे यामध्ये ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) किंवा दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या लोक समाविष्ट आहेत.दरम्यान पहलगाम येथील बैसरान व्हाॅलीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सीसीएस बैठक सुरू आहे.दक्षिण काश्मीर मध्ये चोकशी साठी आतापर्यंत १२ जणांना ताब्यात घेतले आहे.दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रात्री श्रीनगरला जाणार आहेत. ‘ दहशतवाद्यांना असा धडा शिकवा जो ते कधीही विसरणार नाहीत, असं अंध्राप्रदेशचे मुख्यमंत्री नारा लोकेश यांचे मोंदीना आवाहन केले आहे.पहलगाम हल्ल्याच्या नंतर लष्कराची कारवाई, तसेच कुलगाम मध्ये दहशतवाद्यांना घेरले आहे.