पुणे २३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मू काश्मीर येथील पहलगाम मधील बैसराणा येथील व्हाॅलीमध्ये द रेझिस्टन्स फ्रंट या अतिरेकी संघटनेच्यावतीने मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्या च्या सुमारास पर्यटकांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात २८ पर्यटक यांचा मृत्यू झाला आहे,यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे की.यातील हेमंत जोशी व अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन विशेष विमान हे दुपारी सव्वा एक वाजता श्रीनगर वरुन मुंबई साठी रवाना होईल.तसेच पुण्यातील कौस्तुभ गणबोटे व संतोष जगदाळे यांचे पार्थिव सायंकाळी सहा वाजता पुण्यासाठी रवाना होईल याव्यतिरिक्त संजय लेले व दिलिप डिसले यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात येईल.अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.