Home Breaking News जगदाळे यांचे पार्थिव आज पहाटे पुण्यातील कर्वेनगर येथे दाखल, कुटुंबाच्या भेटीसाठी पवार...

जगदाळे यांचे पार्थिव आज पहाटे पुण्यातील कर्वेनगर येथे दाखल, कुटुंबाच्या भेटीसाठी पवार दाखल

87
0

पुणे २४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला त्यात जवळजवळ एकूण ३० पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.यामध्ये पुणे येथील संतोष जगदाळे व गणबोटे यांचे पार्थिव आज विशेष विमानाने पुण्यातील कर्वेनगर येथील घरी आणण्यात आले आहे.दरम्यान जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या आपल्या मुलाची अशी अवस्था बघून त्यांच्या आईने एकच हाबंरडा फोडला.त्यावेळी त्यांची पत्नी व मुलांनाही अश्रू अनावर झाले.

दरम्यान संतोष जगदाळे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वांत्वनपर भेटीसाठी शरद पवार हे कर्वेनगर येथे जगदाळे यांच्या घरी पोहोचले आहेत.यावेळी पवार यांनी जगदाळे यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली जगदाळे हे पहलगाम येथे पर्यटना साठी गेले होते.त्यावेळी तिथे दहशतवाद्यांनी हल्ला केला.या हल्ल्यात त्यांचा बळी गेला आहे.आज पहाटे जगदाळे यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात आणले . त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Previous articleपाकिस्तानाला तगडा झटका… भारताने घेतला मोठा निर्णय, पाकिस्तानी अधिकारी व नागरिकांना परत जाण्याचा आदेश
Next articleभारत पाणी व वीज सर्व बंद करणार ,पाकिस्तान पाणी पाणी करुन दम तोडणार होणार भयानक दुष्काळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here