पुणे २४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील बैसरान व्हाॅली मध्ये पाकिस्तान यांनी पाळलेल्या दहशतवाद्यांनी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मंगळवारी अंदाधुंद गोळीबार केला यात भारतातील ३० पर्यटकांचा यात दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.यात दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळीबार केला आहे.यानंतर जम्मू काश्मीर पासून याचे संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले आहेत.बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लष्कराच्या तिन्ही दलाच्या अधिकारी यांच्या बरोबर बैठक झाली आहे.यात तिन्ही दलाच्या सेनांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दरम्यान भारत आता सर्वच थरावर पाकिस्तानची नाकाबंदी करणार आहे.दरम्यान भारत पाणी वीज तसेच व्यापार अटारी बाॅर्डर तसेच भारतात असलेले पाकिस्तानचे राजदूत कार्यलय कालच बंद करण्यात आले आहे.दरम्यान भारताच्या वतीने सिंधू जल करार रद्द केल्याने आता पाकिस्तानला मोठा झटका ४४० व्होल्ट बसला आहे.या करारानुसार भारत.सिंधू व झेलम तसेच चिनाब नदीतून पाकिस्तानला पाणी पुरवठा करतो.दरम्यान १३५ मीलीयन एकर-फूट वर्षाला जात होते.या पाण्याचा फायदा पाकिस्तान मधील पंजाब व सिंधू प्रांतातील नागरिकांना होतो. मात्र आता पाणीच रोखल्याने या भागात कडक दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. तसेच यामुळे सिंचन बरोबर जलविद्युत निर्मितीवर देखील मोठा परिणाम होणार आहे.यात सर्वात जास्त फटका पंजाब व सिंधू प्रांतातील लोकांना बसणार आहे. एकंदरीत पाकिस्तान पाणी पाणी पाणी करुन दम तोडणार आहे.