पुणे २४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) एका जन्मदाती आईसाठी व पत्नीसाठी अन् संपूर्ण कुटुंबासाठी मंगळवार २२ एप्रिल हा एक काळा दिवसच आहे.जम्मू काश्मीर येथील पहलगाम मध्ये पाकिस्तानने पाळलेल्या दहशतवाद्यांनी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला.यात ३० पर्यटकांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे.यात कर्नालचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू झाला.दरम्यान काही दिवसांपूर्वीच विनयचे लग्न झाले होते.पत्नी हिमानीच्या हातावरील मेहंदीही उतरली नाही,पण त्याच हातांनी तिने जयहिंद म्हणत विनयला अखेरचा निरोप दिला आहे.तर जन्मदाती आईने आपल्या लेकराला खांदा दिला आहे.तसेच बहिण व वडील यांनी विनयवर अंत्यसंस्कार केले आहे.
दरम्यान मंगळवारी २२ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तानने पाळलेल्या दहशतवाद्यांनी फिरण्या साठी आलेल्या पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात ३० पर्यटकांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला आहे. यात भारतीय नैदलातील लेफ्टनंट पदावर असलेल्या विनय नरवाल यांचा देखील या मृतांमध्ये समावेश आहे. या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कित्येक संसार उद्धवस्त झाले आहे. दरम्यान विनय व हिमानी यांचे काहीच दिवसांपूर्वीच लग्न झाले होते.ते या ठिकाणी फिरण्या साठी आले होते.हा त्यांचा शेवटचा व्हिडिओ आहे. दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सर्वच हिरावले.विनयचा मृत्यू झाला अन् हिमानीची मेहंदी रक्ताने माखली.