पुणे २५ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मंगळवारी दिनांक २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बैसरान व्हाॅलीमध्ये दहशतवादी यांनी पर्यटकांच्या हल्ला केला यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.त्यानंतर भारताने लगेच पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलली.आता या नंतर आता यावर खुद्द पाकिस्तानी लष्कराचे माजी सैनिक आदिल राजाने ह्या हल्ल्याची पोलखोल केलीय आहे.दरम्यान पहलगाम येथील हल्ला हा पाकिस्तानी लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या आदेशानुसार झाला आहे.असा दावाच आदील राज यांनी केला आहे. तसेच मुनीर यांनी हा हल्ला आपल्या वैयक्तिक हिता साठी केला आहे.एका खुर्ची साठी निष्पाप लोकांचे रक्त सांडले गेले,असे देखील त्यांनी म्हटले आहे.