पुणे २६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबाबत वादग्रस्त विधान केले. त्यावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस हे म्हणाले की महायुती मधील सत्ताधारी आमदारांनी 👮 पोलिसांबद्दल असे बोलणं योग्य नाही.यावर आता मी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे की तुम्ही आमदार संजय गायकवाड यांना कडक समज द्यावी.हे असं चालणार नाही.हे योग्य नाही.दरम्यान वारंवार ते असे बोलत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल.असे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले होते की महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही.असे विधान त्यांनी केले होते. तसेच गायकवाड असं देखील म्हणाले की पोलिसांनी 👮 जर ५० लाख रुपये पकडले तर ते फक्त ५० हजार रुपये दाखवतात.तसेच माझ्या मुलांपर्यंत पोहोचण्या साठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावा लागेल.पोलिस काही देखील करु शकणार नाहीत.