Home क्राईम पुण्यात गोळीबाराच्या घटनेनंतर एकच खळबळ , कोंढवा पोलिसांनी एकाच्या आवळल्या मुसक्या

    पुण्यात गोळीबाराच्या घटनेनंतर एकच खळबळ , कोंढवा पोलिसांनी एकाच्या आवळल्या मुसक्या

    106
    0

    पुणे २६ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)  आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही पुण्यातून आली आहे.पुण्यात गोळीबाराची घटना घडली आहे. सदरची घटना ही कोंढवा भागात घडल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.दरम्यान श्रीकांत कानडे यांच्या घरावर गोळीबार झाला आहे.दरम्यान गोळीबाराच्या घटनेत घरामधील लोक सुरक्षित आहेत.व कोणतीही व्यक्ती या गोळीबारात सुदैवाने जखमी झाले नाहीत. दरम्यान या गोळीबाराच्या घटनेनंतर या भागात एकच खळबळ उडाली आहे.व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान सदरचा गोळीबार का व कशाच्या कारणांमुळे झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान सदरची घटना कोंढव्यातील साळुंखे विहार या भागात घडली आहे.याबाबत कानडे यांनी याबाबत पोलिस कंट्रोल रूमला फोन करून सांगितले.त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन यात  बिलाल जुल्फिकार शेख यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.बिलाल यांने कानडे यांच्या घरावरील किचनवर छ-याच्या बंदुकीच्या सहाय्याने चार राउंड फायर केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

    Previous articleकौस्तुभ गनबोटे यांच्या घरी कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री दाखल
    Next articleउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार गायकवाड यांना समज द्यावी -देवेंद्र फडणवीस

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here