पुणे २७ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट ही दिल्ली मधून आली आहे.दिल्लीतील रोहिणी परिसरात 🔥 लागली आहे.या भिषण आगीत ८०० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.या आगीत दोन मुलांचा होरपोळून मृत्यू झाला आहे.आगीत घरातील सिलिंडर स्फोट झाला त्यामुळे आणखी आग मोठ्या प्रमाणावर भडकली आहे.सर्वत्र धुराचे मोठ मोठे लोट दिसत आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या एकूण २६ गाड्या तातडीने दखल झाल्या आहेत.या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे.दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली आहे.हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.