पुणे २८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती एक खळबळजनक अपडेट दिल्ली येथून आली आहे.जम्मू काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर भारत,व त्यांचे सैन्य आणि सुरक्षा एजन्सींच्या विरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामर्गी,खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल गृहमंत्रालयाच्या शिफारशीवरुन भारत सरकारच्या वतीने डाॅन न्यूज,समा टिव्ही,जिओ न्यूजसह तब्बल १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे.यात पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर याला देखील मोठा दणका बसला आहे.भारत सरकारने केलेल्या कारवाईत त्याचा चॅनल बंद पडला आहे.शोयब अख्तर हा नेहमीच भारत देशाच्या विरोधात जहरी टीका टिप्पणी करत असतो.