Home राजकीय महाराष्ट्रात ५८ लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या,याचा २कोटींपेक्षा जास्त मराठ्यांना होणार फायदा

    महाराष्ट्रात ५८ लाख मराठा कुणबी नोंदी सापडल्या,याचा २कोटींपेक्षा जास्त मराठ्यांना होणार फायदा

    121
    0

    पुणे २८ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)  महाराष्ट्र सरकार मधील महायुतीचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.या समितीने महाराष्ट्रातून कुणबी जातीच्या नोंदी शोधून काढल्या आहेत.दरम्यान या समितीला आतापर्यंत तब्बल ५८ लाख ८२ हजार ३६५ मराठा कुणबी नोंदी सापडल्या आहेत.या नोंदीचा फायदा २ कोटींपेक्षा अधिक मराठा कुटुंबातील सदस्य यांना होणार आहे.दरम्यान आतापर्यंत या नोंदीच्या आधारे ८ लाख २५ हजार ८५१ लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले आहे, दरम्यान या करीता मराठा समाजाचे नेते व आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सलग उपोषण व आंदोलन करुन महायुती सरकारचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना घाम फोडला होता.

    Previous articleआज जम्मू काश्मीरचे एक दिवसीय अधिवेशन
    Next article‘५ लाखांपेक्षा जास्त पाकिस्तानी मुली लग्न करून भारतात राहतात ‘

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here