Home क्राईम काॅग्रेस पक्षाचे माजी मंत्री सुरेश कलमाडींना काॅमनवेल्थ घोटाळ्यात क्लीन चिट, पुण्यात काॅग्रेस...

    काॅग्रेस पक्षाचे माजी मंत्री सुरेश कलमाडींना काॅमनवेल्थ घोटाळ्यात क्लीन चिट, पुण्यात काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

    80
    0

    पुणे २९ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम)  आताच हाती एक राजकीय वर्तुळातून अपडेट आली असून.काॅग्रेस पक्षाचे माजी रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी यांना काॅमनवेल्थ भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.त्यामुळे पुण्यातील काॅग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. दरम्यान काॅग्रेस पक्षाचे नेते सुरेश कलमाडी यांनी सन २०१० साली काॅमनवेल्थ घोटाळा केला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.त्यामुळे त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले होते.आता तब्बल १५ वर्षांनी हा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर करण्यात आला आहे.दरम्यान या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट ईडीच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आला आहे

    दरम्यान तब्बल १५ वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर आता पडदा टाकत न्यायालयाने सोमवारी दिनांक २८ एप्रिल रोजी काॅमनवेल्थ घोटाळा २०१० साल राष्ट्रकुल स्पर्धाचा आयोजन समितिने सुरेश कलमाडी व तत्कालीन सरचिटणीस ललित भानोत व इतारांविरुध्द  मनी लाॅड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालया चा (ईडी) क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.दरम्यान सन २०१० साली काॅमनवेल्थचे आयोजन करण्यात आले होते.यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.  सध्याच्या प्रकरणासह अनेक गुन्हे व मनी लाॅड्रिंगची प्रकरणे दाखल होती.यात दोन महत्वाच्या करारांचे वाटप आणि अंमलबजावणीत सुरेश कलमाडी व इतरांवर गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी म्हटले, सीबीआयने भ्रष्टाचाराचा खटला आधीच बंद केला . ईडीने मनी लाॅड्रिंगची चौकशी सुरू केली आणि अहवाल स्वीकारला आहे.दरम्यान सीबीआयने दाखल केलेल्या खटल्याच्या आधारे ईडीने एकमेव मनी लाॅड्रिंगची चौकशी सुरू केली होती.सीबीआयच्या म्हणण्यानुसार काॅमनवेल्थशी संबंधित कामांचे कंत्राट गेम्स वर्कफोर्स सर्व्हिस ( जीडब्लूएस) आणि गेम्स प्लॅनिंग.प्रोजेक्ट अॅड रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिसेस GPPRMS होते.आरोपींनी ईकेएस व अन्रस्ट अॅड ३ यंग यांच्या कन्सोट्रियमला जाणिवपूर्वक आणि चुकीच्या पद्धतीने दोन्ही कंत्रांटे देऊन अनुचित आर्थिक फायदा मिळवून दिला.त्यामुळे ओसी काॅमनवेल्थला ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. असा आरोप सीबीआयने २०१४ मध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.त्यात म्हटले आहे की,या प्रकरणात तपासादरम्यान कोणतेही गुन्हेगारी पुरावे समोर आले नाहीत.तसेच आरोपींविरुद्ध एफ आय आर मधील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत.दरम्यान सन २०१० मध्ये दिल्लीत काॅमनवेल्थ गेम्स (CWG) चे आयोजन करण्यात आले होते.यासाठी विविध प्रकारची कामे आणि कंत्राटे दिली गेली होते.या काॅमनवेल्थमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप त्यावेळी विरोधी पक्षाने केला होता.यावरुन सीबीआय आणि ईडी या संस्थांनी स्वतंत्र चौकशा सुरू केल्या होत्या.या प्रकरणात काॅमनवेल्थ गेम्स ऑर्गनायझिंग कमिटीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी व सरचिटणीस ललित भनोट आणि इतर अधिकाऱ्यांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते ‌त्यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

     

    Previous articleभारतीय गृहमंत्रालयाने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनल व टिव्ही चॅनलवरबंदी घातली आहे,शोयब अख्तरच्या चॅनलचा समावेश
    Next articleआज अक्षय तृतीया मंगलमय दिवस! तुमच्या घरात लक्ष्मीचा सदैव वास राहो

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here